मी आणि वास्तव.

आज खूप कंटाळा आला आहे, काय करावे काही सुचत नाही, वाटले वर्तमान पत्र घेऊन वाचावे पण त्यात सुद्धा नेहमीच्याच बातम्या राजकारण, खून,बलात्कार, चोरी अगदी कंटाळा आला तेच तेच रोज वाचून. वाटले जावे कुठेतरी शांत ठिकाणी, आणि फिरावे एकांतात मन नेईल तिकडे, भटकावे आणि स्वैर धावावे सुद्धा, परंतु पुन्हा भानावर आलो, जावे वाटत असताना सुद्धा जावू शकत नाही, कारण या रोजच्या धकाधकीच्या जीवनाची आता सवय झाली आहे. लोकांच्या गर्दीत मिसळण्याची आणि त्यांच्यात विरून जाण्याची जणू जगण्याची रीतच बनली आहे. कारण हे वास्तव आहे. आणि ते स्वीकारले पाहिजे नाहीतर हे जग तुम्हाला झिडकारून देईल एका  काळोख्या कोपऱ्यात. हे जग आपले आहे, इथे आपली माणसे राहतात. आपले आई- वडील, भाऊ - बहिण, मित्र  आणि नातेवाईक, त्यांना सोडून जावेसे वाटत नाही. म्हणून कंटाळा करून चालणार नाही उलट नव्या उमेदीन कामाला लागून काहीतरी वेगळे करण्याची क्षमता ठेवली पाहिजे.

Comments

Popular posts from this blog

चित्रपट : समीक्षा आणि सिद्धांत

निसर्ग

कसरत तारेवरची आणि गमतीची..