Posts

Showing posts from 2011

चित्रपट : समीक्षा आणि सिद्धांत

Image
भारत   हा जगात सर्वाधिक चित्रपट   निर्मिती करणारा देश   आहे. परंतु   चित्रपट   हा अभ्यासविषय म्हणून आपल्याकडे   पुरेसा रुजलेला   नाही. वर्तमानपत्रांचे , मासिके व   अन्य नियतकालिकांचे   रकानेच्या   रकाने   चित्रपटविषयक मजकुराने भरलेले असतात. पुरवण्याच   काय , स्वतंत्रपणे   चित्रपटविषयाला वाहिलेली नियतकालिके सुद्धा कमी   नाहीत. आकाशवाणी , दूरचित्रवाणी माध्यमांतून देखील चित्रपटांवर भरपूर बोलले जाते. पण त्यात कुठेही गंभीर समीक्षेला स्थान नाही. त्यात प्रामुख्याने असते ते गॊसिपिंग – कुजबुज – चर्चा. मग येतात वर्तमानपत्री परीक्षणे. यात चित्रपटांच्या गोष्टी लिहिलेल्या असतात ; अभिनय , संगीत , दिग्दर्शन यांच्याविषयी चार – दोन वाक्ये असतात आणि हा चित्रपट सर्वसाधारण समाजाला कितपत पाहण्याजोगा आहे , त्याचे रेटिंग – म्हणजे मूल्यांकन करणारे एखादे वाक्य किंवा स्टार्स दिलेले असतात. आणि यालाच चित्रपट समीक्षा मानण्याची प्रथा आहे. जी काही पुस्तके आहेत ती चित्रपटाचा इतिहास फुटकळपणे मांडणारी , गोष्टी सांगणारी , माहिती देणारी , आठवणीवजा... अ...