निसर्ग
सकाळी उगवणारा सुर्य आणि संध्याकाळी मावळणारा सुर्य हा एकच आहे परंतु त्याच्या उगवणे आणि मावळणे या दोन क्रियांमध्ये माणसाच्या किती गोष्टी बदलत जातात, जसजसा सुर्य वर येत जातो, तसतशी माणसे आपली कामे करत राहतात. म्हणजे सकाळी उठण्यापासून ते रात्री झोपे पर्यंत सारे काही सूर्याच्या क्रियेवर अवलंबून आहे. म्हणजे मानव मूलतः निसर्गावरच सर्वस्वी अवलंबून आहे, म्हणून या निसर्गाचा योग्य समतोल राखणे आपल्या हातात आहे.