कसरत तारेवरची आणि गमतीची..
आरे बापरे !! 8 वाजून गेले , ऑफिस सुटायची वेळ निघून गेलीय , मी घाई - गडबडीत फ्रेश होऊन , ऑफिसातून निघालो .. नेहमीची बस मिळेल कि नाही या विचारात चालत असताना , मागे पहिले तर सिग्नल वर मला बस उभी आहे हे दिसले . जरा हायसे वाटले . मी स्टॉप वर तसाच थांबलो , जरा आभाळाकडे लक्ष गेले वारा सुटला होता , आणि आभाळ चमकत होते , अगोदरच खूप वेळ त्या स्टॉप वर वाट पाहणारा एक माणूस मला म्हणाला , बाळा विजा चमकत आहेत पाऊस येईल बघ आज . बस आली मी बस मध्ये मोठ्या दिमाखात प्रवेश केला आणि एक विंडो सीट पकडली , माझ्या मागे तो माणूस बस मध्ये चढला आणि तोही माझ्याच बाजूला येऊन बसला . मी तिकीट काढले , त्यांनीही तिकीट काढले , मी खिडकीतून बाहेर बघत होतो , मनात कुणाची तरी आठवण घोळत होती , आणि डोक्यात कुणाचे तरी विचार येत होते . बस स्टॉप वर स्टॉप घेत स्टेशन च्या दिशेने निघाली होती , तेवढ्यात माझ्या बाजूला बसलेला माणूस मला म्हणाला , " बाळा मी म्हणलो हुतो ना पाऊस येल ते " " वि...