मेघदूत "तिच्या" अन "त्याच्या" मधला..



 आसमंत भारलेली तिन्हीसांजेची घटका पांघरून, दूर माळरानावर  उडालेल्या पक्ष्यांच्या चौफेर थव्यांत आणि बरसुनी येणाऱ्या मेघांच्या दाटिवाटीतून "त्याने" एका छोट्या मेघाला "तिला" निरोप देण्यासाठी पाठवले आहे. तो मेघ "तिला" भेटण्यासाठी निघाला आहे. तो जरा जिद्दी आहे आणि बहुदा हट्टी सुद्धा आणि जरासा वेडा. सूर्याच्या संधी प्रकाशात न्हाऊन निघालेला एक एकटा मेघ मंद वाहणाऱ्या वाऱ्यावर स्वार होऊन, जणू "कालिदासाने" आपल्या दूर अंतरी राहणाऱ्या प्रियेला निरोप धाडलंय या अविर्भावात संथपणे पुढे चालला आहे, पण "त्याला" तिच्या  भेटीची ओढ  आहे. "तीत्याचे सर्वस्व आहे. त्याचे प्रेम आहे, त्याचा श्वास आहे. वाटेत गर्जणारा मल्हार तुफान तांडव करून ह्या छोट्या मेघाच्या समोर उभा ठाकला परंतु घाबरता तो पुढे चालत राहिला आहे.   वाटेत खूप तारका भेटत राहिल्या मंद - प्रकाशमान झालेल्या, पण तिकडे आकर्षित होता ह्या मेघाला "तिच्या" भेटीची आस आहे. "त्याने" दिलेले पत्र "तिला" द्यायाचे आहे. कारण ती  निराळी  आहे, ती स्वतंत्र आहे. ती दुसऱ्या ताऱ्यांपेक्षा सुंदर आणि मनमोहक आहे, ती पऱ्यांच्या राज्यातली राणी आहे.
      काहीतरी उगाचच घडलं आणि ती  रागावून - रुसून बसली . दोघांचे बोलणे हि बंद झाले, एका छोट्या ढगाला खूप वाईट वाटले. त्या मेघाने "त्याच्याशी" हट्ट धरला तुझा निरोप मी "तिच्याकडे" घेऊन जातो.  "तिच्या" ओढीने "तू' किती कासावीस झाला आहेस हे "तिला" सांगतोपण त्याला माहित आहे  "ती" तिचा  हट्ट सोडणार  नाही. मनाने  जवळ असून दोघे जरा दूर आहेत. अजूनही दोघांच्यात रुसवा आहे. "त्यालाही" खूप वाटतेय "तिने" बोलावे, भांडावे माझ्याशी पण "ती - ती" आहे, "तिची" जिद्द आणि निर्णयक्षमता  "त्याला माहित आहेपरंतु त्या छोट्या मेघाला पूर्ण विश्वास आहे सगळे ठीक होईल. फक्त "तिचा" राग जरा शांत होऊदे..
       तो मेघ दूर नभाच्या पल्याड "त्याचा" संदेश घेऊन "तिला" भेटण्यासाठी निघाला आहे. कागदावर कोरलेल्या खूप साऱ्या व्यथा "तिला" दाखवायच्या आहेत.. त्या मेघाने ठरवले आहे, आता मेघ मल्हार होऊन बरसायचे, आणि त्या बरसणाऱ्या प्रत्येक थेंबांत "तिला" "त्याची" आठवण करून द्यायची. ज्या वळणावर हे दोघे भेटले होते पुन्हा त्याच वळणावर "त्याची" आणि "तिची" भेट घडवून द्यायाची.

                                                                                                                                               
                                                      
                                                                                                                             - अतिश..

Comments

Popular posts from this blog

चित्रपट : समीक्षा आणि सिद्धांत

निसर्ग

कसरत तारेवरची आणि गमतीची..