माझ्या आठवणीतले गाव.
माझ्या आठवणीतले गाव.
गाव सोडून शहराकडे आलो, दहा - बारा वर्ष झाली असतील, परंतु आजून आठवतेय ते आठवणीतले गाव. वाडीत तीस - चाळीस घरे आणि गावात सत्तर - ऐंशी घरं. सकाळ झाली कि गाव गजबजायचे, बायका पाणी भरण्यासाठी विहिरीवर जायच्या, काही घरांतून लहान मुलाच्या रडण्याचा आवाज यायचा, तर काहींची शाळेत जाण्याची घाई असायची शाळा साडे दहा वाजता असली तरी. भाकर - तुकडा आटपून पुरुष मंडळी आणि बायका शेतावर निघायच्या, पोर शाळेत गेलेली असायची, वाडी - गाव शांत व्हायचा. अशातच दुपार व्हायची, ते रणरणते उन, डोळे दिपायचे, मी कॉलेजमधून दुपारीच घरी आलेलो असायचो, वाडीत एक भयाण,निरव शांतता पसरलेली असायची. आर्धी घरे बंद तर अर्ध्या घरांचे दरवाजे उघडे असायचे कारण त्या घरांत कुणी म्हातारा किंव्हा म्हातारी असल्यामुळे... अचानक कुण्या घरातून तान्ह्या मुलाच्या रडण्याच्या आवाजाने ती शांतता भंग पावायची, कोण एक मुलगा उगाचच शाळेत गेलेला नसायचा तो आपले शेंबडे नाक पुसत त्याच्या आजीचे पदर धरून तिच्या मागे ताटकळत उभा राह्यचा आणि तिच्याकडे तगादा लावायचा की, मला पैसे दे दुकानावर जायाला.रस्त्याने अचानक एखादी गाडी भुर्र... करून जायाची, अशातच मी जेवून पडवीत बसायचो आणि त्या रणरणत्या उन्हाकडे पाहत माझ्या तोंडून काही शब्द निघायचे....
"माथ्यावरती उन्हं चढावी
पावलांत सावल्या विराव्या
घाटावरती शुभ्र धुण्याच्या
पाकोळ्या अन मंद झुलाव्या
डोंगर व्हाव्हेत पेंगुळलेले
पोफळ बागा सुस्त निजाव्या
आंगणातल्या हौदावारती
तहनेलेल्या मैना याव्या
लुकलुकणारे गोल कवडसे
निंबाच्या छायेत दिसावे
खारीचे बावरे जोडपे
बकुलीखाली क्षणिक बसावे
कुरणांच्या हिरवळीत
ओल्या उनही होऊन जावे
कधी कुठचे नंगार्लेले शेत
पावसासाठी झुरावे"
मी पाचवीच्या वर्गात असताना मला हि कविता होती, मला कवींचे नाव आठवत नाही परंतु आत्ता सुद्धा हि कविता माझ्या मनात घर करून राहिली आहे, अशा असंख्य "दुपार" साठी.

Comments
Post a Comment