- दंगली वारे..

                                                                    -  दंगली वारे..


                                                                                                                                              - अतिश..




आरे काय चाललंय? माझ्या अमेरिकेला गेलेल्या मित्राने मला एक मेसेज पाठवला. मी तो मेसेज वाचून त्याला उत्तर दिले, "माझे ठीक चाललंय, पण आपल्या भारतात काही ठीक नाही चाललंय".
त्याने पुन्हा मेसेज केला, 'का रे काय झाले अचानक'?  
 'अचानक नाहीरे, नेहमीचेच?' 
 'म्हणजे'?
'आरे  इकडे उन्हाचा पारा खूप वाढलाय आणि लोकांची डोकी पण खूप तापलीत बाबा.'
'म्हणजे रे?'
'आपल्या भारतात ना सध्या सोशल मीडियाचा वापर खूप वाढलाय, जो तो उठतोय आणि whats aap, fecbook,facebook live, youtube वर आशा पोस्ट प्रसारित करत आहेत की त्याने लोकांची माथी भडकली जात आहेत.'
माझ्या मित्राने पुढचा मेसेज टाईप केला,  'म्हणजे  नेमके काय झाले?'
'आरे तुला माहितीये तिकडे काश्मीर ला म्हणे सरकारने इंटरनेट स्पीड ४G वरून २G वर आणलाय' मी म्हणालो.'
'म्हणजे'? त्याचा प्रश्नार्थीक सवाल.
'आरे काश्मीर ला जैसे थे चालू आहे. दगडफेक, जाळपोळ, हिंसाचार वाढलाय. तरुण - छोटी - छोटी मुले रस्त्यावर उतरून दगडफेक करताहेत. काही वीडियो, फोटो शेअर करताहेत. क्रांतिकारी गोष्टी बरळत आहेत. सैनिकांची आणि काही मोजक्या जनतेची जणू लढाईच चालले आहे, फार भयानक वातावरण तयार झालेय.'
'आरे बापरे' ! त्याचा उद्गारवाचक सवाल.
'मी म्हणालो. आरे बापरे! काय? हे तर नेहमीचेच आहे.
'तो म्हणाला हे कधी बंद होईल?'
'हं हे बंद होणार नाहीये, जर काश्मीर मुद्दा बंद झाला तर राजकारण करायला काही उरणारच नाही, मग नेत्यांच्या पोटा - पाण्याचे काय? त्यांना बिचाऱ्यांना वणवण  करायला लागणार ना.'
त्याचा पुढचा खोचक सवाल, काय होईल रे आपल्या देशाचे? कधी सुधारतील हे लोक?
मी म्हणालो तुला एक गम्मत सांगतो,
'इकडे ना काही नामांकित सेलिब्रेटी तोंडाला येईल ते बरळत आहेत. प्रसिद्धी साठी कि मानसिक स्थिती ठीक नाहीये म्हणून काहीही बोलत सुटले आहेत बहुदा.'
'म्हणजे रे?'
'आरे म्हणे पहाटेची अझान, मंदिरातला घंटानाद हे त्रास दायक आहे वैगरे.
'आणि तुला एक सांगतो भारतात सध्या 'मस्जिद - मंदिर, अझान, गौ - हत्या" ह्या मुद्द्यांवरचे काळे ढग तयार झालेत. मान्सून येण्यापूर्वीच इकडे "दंगली वारे" येणार आहेत'.
त्याला नीटसे समजले नाही, त्याने पुन्हा प्रश्न केला,
"दंगली वारे" हे कोणते नवीन वारे?
मी म्हणालो 'आरे हे दंगली वारे सगळ्या जगात आहेत, ज्यावेळी माणसाचा जन्म झाला ना त्यावेळेस हे वारे यायला सुरुवात झाली. कुठे कुठे नामशेष होण्याच्या मार्गावर होते पण माणसाने ते नामशेष होऊ दिले नाहीत. आपल्या भारतात तर खूप आधीपासून हे "दंगली वारे वाहत आहेत, ह्या वर्षांपासून जरा जास्तच वाहायला सुरुवात झाली आहे.
त्याने माझ्या "दंगली वाऱ्यांचे" पुराण मधेच थांबवले आणि मला म्हणाला, तुला आठवतेय का?
मी म्हणालो 'काय रे"?
तो म्हणाला मी माझी पहाटेची आझान उरकून तुला कॉलेज ला निघण्यासाठी, तुला उठवण्यासाठी तुझ्या घरी नेहमी यायचो.
'मी म्हणालो हो - हो आठवतेय ना, पण मी आधीच उठून तयार असायचो, ती पहाटेची अझान ऐकून मला खूप बरे वाटायचे.'
' तू आता अमेरिकेला शिफ्ट झालास, कॉलेज पण संपले  पण आजही कधी ती आलाह च्या घरातली पहाटेची अझान ऐकली कि तुझी आठवण येते भावा.'
तो गहिवरला, आणि म्हणाला 'तुझ्या आईने दिलेली ती  "विभूती" आहे आजून माझ्याकडे.
अंधश्रद्धा नाही पण श्रद्धा आहे. काही महत्वाचे काम असेल तर मी ती विभूती कपाळावर लावतो.
तुझ्या आईने काळजीपोटी दिलेली आणि आपल्या मैत्रीचा विश्वास म्हणून.'
मला काय बोलू सुचत न्हवते, 
तोच पुढे बोलला 'हे दंगली वारे कोण थांबवेल का?
मी म्हणालो ' हो - हो का नाही थांबणार, इकडे जो तो स्वतःला राव बहादूर समजतो आहे. काही मोजक्या लोकांची मनोवृत्ती बदलली किंव्हा, सवेंदनशील गोष्टीत राजकारण आणणे सोडले कि हे "दंगली वारे कदाचित थांबतील ही.'
तो म्हणाला 'थांबायला पाहिजे हे सगळे ?'
मी म्हणालो थोडा काळ जाईल, वेळ जाईल पण  एक दिवशी नक्की थांबेल, आणि एक लाल सकाळ येईल आशेचा नवा सूर्य घेऊन. तेव्हा तुझ्या  आलाह च्या घरातली आझान, माझी त्रिसरण - पंचशील, मंदिरातला घंटानाद कायम त्या "दंगली वाऱ्यांना" भिडला जाईल.
हे वाचून माझ्या मित्राला जरा भरून आले, तो म्हणाला तुझ्या आशाच बोलण्यावर माझा विश्वास आहे. 
त्याचे हे वाक्य वाचून मला बरे वाटले.


                                                                                     - अतिश..

Comments

Popular posts from this blog

चित्रपट : समीक्षा आणि सिद्धांत

निसर्ग

कसरत तारेवरची आणि गमतीची..